khabarbat

Advertisement

‘X’ मुळे एलन मस्कला ३४ अब्ज डॉलर्सचा फटका

 

नवी दिल्ली । khabarbat News Network

Elon Musk lost 34 billion dollars due to ‘X’ | लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केल्यानंतर एलन मस्कने त्याचे नाव ‘एक्स’ असे ठेवले होते. टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांचे मालक असलेल्या एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केले होते. मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी मोठी रक्कम मोजली होती. ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्स देऊन ट्विटर खरेदीची डील एलन मस्क यांनी केली होती.

मात्र, एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचे बाजारमूल्य ७५ टक्क्यांनी घटले आहे. यामुळे फक्त एलन मस्कच नाही इतर गुंतवणूकदार देखील चिंतेत असल्याची माहिती आहे. बाजारमूल्य घटत राहिलं तर लवकरच ‘एक्स’ प्लॅटफॉर्मबाबत एलन मस्कला मोठा निर्णय घ्यावा लागेल.

फिडेलिटी ब्लू चिप ग्रोथ फंड यांच्या एका रिपोर्टनुसार एलन मस्कने ट्विटर ४४ अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली होती. फिडेलिटीने यामध्ये १.९६ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली होती. मात्र, जुलै २०२४ च्यामध्ये फिडेलिटीच्या शेअर्सची किंमत ५५ लाख डॉलर्सवर पोहोचली होती. त्या रिपोर्टनुसार ‘एक्स’चे बाजारमूल्य ९.४ अब्ज डॉलर्स राहिले आहे. एलन मस्क जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असला तरी त्याला ३४ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.

The market value of ‘X’ remains at 9.4 billion dollars. Although Elon Musk is the richest person in the world, he lost 34 billion dollars.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »