ढाक्का | News Network
Ban on Durga Puja : सत्तांतरानंतर बांगलादेशमधील परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली असून, येथे धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर टार्गेट करण्यात येत आहे. बंगालप्रमाणेच बांगलादेशी हिंदूही नवरात्रौत्सव आणि दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणात साजरा करतात. मात्र बांगलादेशात यावेळी दूर्जा पूजेवरून वाद सुरू आहे. अनेक ठिकाणी हिंदूंना दुर्गा पूजेची परवानगी नाकारण्यात आली आहे. काही ठिकाणी देवीच्या मूर्ती तोडण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सरकारी सूत्रांनी सांगितले की, ९ ऑक्टोबरपासून सुरू होणा-या दुर्गापूजेपूर्वी प्रत्येक मंडळाला प्रत्येकी ५ लाख रुपये जिझिया कर म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक समित्यांनी यावेळी दुर्गा पूजा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज सकाळीच किशोरगंज येथील बत्रिश गोपिनाथ जीउर आखाडा येथे दुर्गामातेची नवी मूर्ती तोडण्यात आली. तर कोमिला जिल्ह्यामध्येही दुर्गामातेची नवी मूर्ती तोडण्यात आली. तसेच मंदिरातील दानपेटीही चोरून नेण्यात आली. नारायण जिल्ह्यातील मीरापारा येथे दोन दिवसांपूर्वी कट्टरवाद्यांनी एका दुर्गा मंदिरावर हल्ला केल्याची घटना घडली होती.
Hindus have been denied permission to worship Durga in Bangladesh. In some places the idols of the goddess Durga have been broken. Meanwhile, government sources said that every mandal has been ordered to pay Rs 5 lakh each as jiziya tax before the Durga Puja, which begins on October 9.