मुंबई : khabarbat News Network
Adani will provide green energy to Google’s Cloud Center : देशातील सर्वात मोठी हरित ऊर्जा कंपनी अदाणी ग्रीन पॉवर आणि गुगल यांच्यात आज (३ ऑक्टोबर) ऐतिहासिक करार झाला. या कराराअंतर्गत गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या ३० गिगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पातून गुगलच्या क्लाऊडच्या डेटा सेंटरसाठी वीज पुरवठा करण्यात येणार आहे.
कोणत्याही डेटासेंटरला मोठ्या प्रमाणात वीज लागते. ही वीज हरित उर्जा प्रकल्पातून निर्मित असल्यास ते डेटा सेंटर देखील हरित डेटा सेंटरच्या यादीत सामील होते. गुगलने आपली सगळी डेटा सेंटर हरित उर्जेवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलच्या या निर्णयाला आता अदानी समूहाची साथ मिळणार आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२५ च्या तिस-या तिमाहीमध्ये अदानी समूहाच्या जगातील सर्वात मोठ्या हरित उर्जा प्रकल्पात पूर्ण क्षमतेने वीज निर्मीती सुरु होईल.
कच्छच्या रणात उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पातून ८१ दशलक्ष युनिट हरित वीज निर्मिती होईल. जवळपास १ कोटी ६१ लाख कुटुंबांना या प्रकल्पातून सौर उर्जा पुरवठा होणार आहे. त्याच प्रकल्पातून आता गुगललाही वीज पुरवठा होईल.
India’s largest green energy company Adani Green Power and Google signed a historic agreement today (October 3). Under this agreement, electricity will be supplied to Google’s cloud data center from the 30 GW solar power generation project set up in Gujarat.