लुधियाना | khabarbat News Network
सायबर भामटे कोणत्या थराला जातील, याची कल्पनाही करता येणार नाही. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने बनावट सुनावणी करून अटकेची भीती दाखवून वर्धमान समूहाचे अध्यक्ष एस.पी. ओसवाल (८२) यांना तब्बल ७ कोटी रुपयांचा गंडा घातला गेला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीची ओळख पटविली असून, दोन जणांना गुवाहाटी येथून अटक केली. आरोपींकडून सुमारे ६ कोटी रुपये परत मिळविण्यात यश आले आहे.
एस.पी. ओसवाल यांना २०१० मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सायबर भामट्यांनी काही उद्योगपतींना अडकविण्यासाठी जाळे विणले होते. ओसवाल यांनी लुधियाना पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार केली. त्यानंतर, पोलिसांनी बँक खात्यांचा तपास करून या टोळीचा म्होरक्या अतनू चौधरी आणि आनंद चौधरी यांना गुवाहाटी येथून अटक केली.