khabarbat News Network
MSRTC has awarded the contract for construction of 2475 buses to Ashok Leyland Company. ST has a fleet of 15,000 buses and the new buses will provide better service to the passengers.
मुंबई | ‘एसटी’च्या ताफ्यात आता अशोक लेलॅण्डच्या साध्या डिझेल बस दाखल होणार आहेत. या बसचे टेंडर काढण्यात आले असून त्या मोठ्या आकाराच्या आहेत. एसटीतील ग्रामीण भागातील वाहतुकीच्या दृष्टीने फायद्याच्या ठरणार आहेत. एसटी महामंडळाने अशोक लेलॅण्ड कंपनीला २४७५ बस बांधणीचे कंत्राट दिले आहे. एसटीच्या ताफ्यात १५ हजार बसचा ताफा असून नवीन बसमुळे प्रवाशांना चांगली सेवा मिळणार आहे.
या बस टु बाय टु आसनी असणार आहेत. या बस आधुनिक आणि ‘सीएमव्हीआर’ स्टॅँडर्डच्या आहेत. या बसची बॉडी ‘एआयएस १५३’ असणार आहे. या नवीन बस बीएस-६ स्टँडर्डच्या असणार आहे. या नवीन बसेसना १९७ एचपी-एच सिरिजचे इंजिन आहे. या बसला रिअर एअर सस्पेन्शन सुविधा आहे.