khabarbat

Delhiites fed up with pollution were offered subsidies and tax waivers to convert them to EVs. This was followed to a lesser extent by other states including Maharashtra.

Advertisement

EV sale goes down | इलेक्ट्रिक वाहन खरेदीला ग्राहकांचा ठेंगा

khabarbat News Network

मुंबई । देशाची राजधानी दिल्लीला इलेक्ट्रिक वाहनांची राजधानी बनवायचे होते. प्रदुषणामुळे वैतागलेल्या दिल्लीकरांना ईव्हीकडे वळविण्यासाठी सबसिडी आणि टॅक्स माफीची खैरात देण्यात आली. याचे अनुकरण कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रासह इतर राज्यांनीही केले. आता ईव्ही वाहनांच्या विक्रीने पुरेसा वेग पकडल्याचे सांगून केंद्राने आणि नंतर राज्यांनी सबसिडी कमी करण्यास सुरुवात केली. पण हेच मुळावर आले आहे.

Delhiites fed up with pollution were offered subsidies and tax waivers to convert them to EVs. This was followed to a lesser extent by other states including Maharashtra. Now that the sales of EVs have picked up enough pace, the Center and then the states have started reducing the subsidy. But this is what it comes down to. 

सबसिडी कमी झाल्याने लोकांना पदरचे पैसे घालून ईव्ही वाहन खरेदी करावे लागत आहे. ईव्ही वाहनांच्या कटकटी पाहता लोक या वाहनांकडे पाठ फिरवू लागले आहेत. ईव्ही वाहनांच्या विक्रीचा चढता आलेख आता घसरू लागल्याची आकडेवारी आली आहे. एप्रिल ते ऑगस्टमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत इलेक्ट्रीक वाहनांचे रजिस्ट्रेशन दोन हजार वाहनांनी कमी झाले आहे.

हीच री आता इतर राज्यांतही ओढली जात आहे. महाराष्ट्रानेही सबसिडी बंद केली आहे. केवळ आरटीओ चार्जेस नाममात्र ठेवण्यात आले आहेत. यामुळे या राज्यांतही ईव्ही वाहनांचा खप कमी कमी होत जाण्याची शक्यता बळावली आहे. गेल्याच महिन्यात ज्या लोकांनी ईव्ही वाहने घेतली त्यांच्यापैकी बहुतांश लोकांना ती पुन्हा घ्यायची इच्छा राहिलेली नाही, असा रिपोर्ट आला होता.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »