A startup company in California, Reflect Orbital, plans to launch satellites into space and bring sunlight back to Earth. The satellite will collect sunlight during the day and transmit it to Earth at night.
khabarbat News Network
नवी दिल्ली | रात्रीसुद्धा सूर्य प्रकाश मिळाला तर? परंतु हा चमत्कार एका स्टार्टअपने केला आहे. यामुळे रात्री चंद्राऐवजी सूर्याची किरणांचा प्रकाश दिसू लागेल. कॅलिफोर्नियामधील स्टार्टअप कंपनी रिफ्लेक्ट ऑर्बिटल अंतराळात उपग्रह सोडून त्या माध्यमातून सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर आणण्याची योजना बनवली आहे. दिवसा हा उपग्रह सूर्यप्रकाश संग्रहीत करेल आणि रात्रीच्या वेळी तो पृथ्वीवर पाठवणार आहे.
रिफ्लेक्ट ऑर्बिटल कंपनीची योजना अंतराळात उपग्रह लॉन्च करण्याची आहे. त्या माध्यमातून सूर्य प्रकाश पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. रिफ्लेक्ट ऑर्बिटलचे सीईओ बेन नोव्हाक यांनी सांगितले की, सूर्य दिवसाच नाही तर रात्रीसुद्धा तुम्हाला प्रकाश देणार आहे. या योजनेला नाव ‘सनलाइट ऑन डिमांड’ असे आहे. यामुळे सूर्य प्रकाश दिवसा आणि रात्रीच्या बंधनातून मुक्त होणार आहे.
५७ लहान उपग्रह पाठवणार : लंडनमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना बेन नोवाक यांनी सांगितले की, आता उर्जेसाठी दिवस उजाडण्याची वाट पाहावी लागणार नाही. जेव्हा लागेल तेव्हा प्रकाश उपलब्ध होणार आहे. हा पर्याय अजेय शक्ती ठरणार आहे. मानवतेसाठी हा पर्याय मैलाचा दगड ठरणार आहे. त्यासाठी जवळपास ५७ लहान उपग्रह लॉन्च करण्याची तयारी केली जात आहे. हे उपग्रह ६०० किलोमीटर उंचीवर परिभ्रमण करणार आहेत.