khabarbat

A terrible accident took place in the capital Delhi on Thursday. A Delhi Transport Board bus caught fire near Jagatpuri Lal Batti in East Delhi.

Advertisement

DTC burning bus | दिल्लीत बर्निंग बसचा थरार… ५० प्रवासी बचावले!

A terrible accident took place in the capital Delhi on Thursday. A Delhi Transport Board bus caught fire near Jagatpuri Lal Batti in East Delhi. There was panic among the passengers as the bus caught fire. Passengers hurriedly got off the bus to save their lives. There was no loss of life in this incident. On the other hand, three fire tenders reached the spot and brought the fire under control. However, the bus was completely burnt to ashes in this fire.

khabarbat News Network

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीत गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली. पूर्व दिल्लीतील जगतपुरी लाल बत्तीजवळ दिल्ली परिवहन मंडळाच्या बसला आग लागली. बसला आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. जीव वाचवण्यासाठी प्रवाशी घाईघाईने बसमधून उतरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुसरीकडे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत बस पूर्णपणे जळून राख झाली आहे.

या आगीनंतर बसमध्ये बसलेल्या लोकांसाठी तिथून बाईकवरुन जाणारी व्यक्ती देवदूत ठरली आहे. बसला आग लागल्याची माहिती बाईकस्वारानेच बसच्या चालकाला दिली, त्यामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचला.

बाईकवरुन जात आलेल्या एका व्यक्तीने बस चालकाला क्लस्टर बसला आग लागल्याचे सांगितले. त्यानंतर चालकाने तात्काळ बस थांबवून आत बसलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले. आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. या बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते आणि सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »