khabarbat

Advertisement

‘एसटी’ची ‘LNG’ बस येणार!

5000 diesel buses of Maharashtra State Road Transport Corporation will be converted into ‘LNG’ buses in a phased manner. These buses will run on liquefied natural gas fuel and will be built on the chassis of ST’s (Maharashtra State Road Transport Corporation) old buses.

khabarbat News Network

मुंबई I महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ५००० डिझेल बसेसचे रूपांतर ‘एलएनजी’ बसेसमध्ये टप्प्याटप्प्याने होणार आहे. द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर धावणा-या या बसेस एसटीच्या जुन्या बसेसच्या चेसिसवरच बांधण्यात येणार आहेत.

या बसेसच्या बांधणीसाठी प्रत्येक बस मागे १९.४० लाख रुपये खर्च येणार आहे. या संदर्भातील निर्णयाला एसटी महामंडळाने अखेर मंजुरी दिली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे निधी देण्याची विनंती देखील करण्यात आली आहे.

२०२३-२०२४ सालच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री अजित पवार यांनी हरित परिवहनाला चालना देण्यासाठी ५ हजार डिझेल बसेसचे द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावरील वाहनांमध्ये रुपांतर करण्याचे जाहिर केले होते.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दि.२२ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या ३०३ व्या बैठकीत पर्यायी इंधनावर चालणा-या वाहनांमध्ये रुपांतरण करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. यानुसार प्रति बस रु.१९.४० लाख प्रमाणे ५००० वाहनांसाठी एकूण रु.९७० कोटी निधी महाराष्ट्र शासनाकडून मागण्यासाठी संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »