In 15 cities in England, a large number of people have taken to the streets. Some protestors have demonstrated violently. Most of the violence occurred in Southport, England. A few days ago, a 17-year-old youth stabbed 3 children with a knife. He died in it. The violence erupted after rumours spread on social media that the accused stabber belonged to an Islamic jihadist group.
khabarbat News Network
साऊथपोर्ट | ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुलांवरील हल्ले वाढले आहेत. त्यामुळे दोन समुदायात तेढ निर्माण झाली आहे. दोन्ही समुदाय एकमेकांसमोर आले आहेत. शनिवारी ३ ऑगस्ट रोजी तर हिंसक जमावाने पोलिसांवर दगड, विटांचा मारा केला. अनेक शहरात पोलीस स्टेशनला आग लावण्याच्या घटना वाढल्या. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. यामध्ये तीन पोलीस जखमी झाले.
इंग्लंडमधील १५ शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनता रस्त्यावर उतरली आहे. तर काही आंदोलकांनी हिंसक प्रदर्शन केले आहे. इंग्लंडच्या साऊथपोर्ट या भागात सर्वाधिक हिंसा झाली. काही दिवसांपूर्वी १७ वर्षांच्या तरुणाने ३ लहान मुलांना चाकुने भोसकल्याची घटना घडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. चाकू भोसकणारा आरोपी हा इस्लामिक जिहादी गटाशी संबंधित असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्यानंतर हिंसा भडकली.
साऊथ पोर्टमधील सुंदरलँडमध्ये नागरिकांनी उग्र प्रदर्शन केले. लिव्हरपूल जवळील साऊथपोर्ट भागात २९ जुलै रोजी एका १७ वर्षीय मुलाने लोकांवर चाकू हल्ला चढवला. त्याने तीन लहान मुलांना भोसकले. या हल्ल्यात लिस डेसिल्वा अगुइर (९ वर्ष), एल्सी डॉट स्टॅनकॉम्ब (७ वर्ष) आणि बेबे किंग (६ वर्ष) यांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले.