Demand for gold is likely to rise to 750 tonnes in 2024 due to duty cuts announced in the budget. Also, the demand for gold and silver is expected to increase during the upcoming festive season.
khabarbat News Network
नवी दिल्ली I अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सोने, चांदी आणि प्लॅटिनमवरील सीमा शुल्कात कपात करण्याची घोषणा केल्यानंतर भावात मोठी घसरण झाली. अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या बारवरील आयात शुल्क १५% वरून ६%, आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्क १५.४% वरून ६% पर्यंत कमी झाले आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन यांनी एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पात घोषित केलेल्या शुल्क कपातीमुळे वर्ष २०२४ मध्ये सोन्याची मागणी ७५० टन होण्याची शक्यता आहे.
एप्रिल-जून तिमाहीत भारतातील दागिन्यांची मागणी वार्षिक तुलनेत १७ टक्क्यांनी घसरून १०६.५ टन झाली. जैन म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे की ग्राहक मोठ्या संख्येने बाजारात येतील. यामुळे तिस-या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) आणि चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, २०२३ मध्ये, भारतातील सोन्याची मागणी घसरून ७४५.७ टन होती. मागणीतील ही घसरण, चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. यामागचे कारण म्हणजे सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती.