khabarbat

There is a conspiracy to create confusion in Maratha society and spread misunderstanding. Manoj Jarange Patil also alleged that this is a move to make the society crazy.

Advertisement

Maratha Reservation I मराठा आरक्षणावरून दिशाभूल नको : मनोज जरांगे

Anti-incumbents are only spreading misunderstandings. There is a conspiracy to create confusion in Maratha society and spread misunderstanding. Manoj Jarange Patil also alleged that this is a move to make the society crazy.

khabarbat News Network

संभाजीनगर I मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मविआ-महायुतीनं एकत्रित निर्णय घेतला पाहिजे. फक्त घुमवा घुमवी नको. आरक्षण द्यायचं असेल तर काही लागत नाही. मनात असल्यावर काहीही करता येते. उगाच काही तरी सांगायचे आणि दिशाभूल करावी यात काही अर्थ नाही. एकमेकांत गैरसमज पसरवण्याचं काम आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही हे ठरवायचंय असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समन्वयक आणि शरद पवार यांच्या भेटीवर भाष्य केले.

छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणावर सरकारने पुढाकार घेऊन लाईव्ह चर्चा घडवून आणणं गरजेचे आहे. या चर्चेसाठी सत्ताधारी, विरोधकांसोबत जरांगे, लक्ष्मण हाके यांच्यासह मराठा, ओबीसी नेत्यांना बोलावावं, या चर्चेतून जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असं शरद पवारांनी म्हटलं होतं, त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लाईव्ह नव्हे तर डोंगरावर जाऊन एकमेकांशी ओरडाओरड करून चर्चा करावी पण आम्हाला आरक्षण पाहिजे. आरक्षणासाठी भेटीगाठी होत नाहीत असा टोला जरांगेंनी लगावला.

दरम्यान, आम्ही कधीही महाविकास आघाडी, महायुती यांना विरोधक मानलं नाही. मराठ्यांची त्सुनामी उसळली आहे त्या लाटेत सर्व वाहून जाणार आहेत. माझा मराठा एक झालेला राजकीय लोकांना पचत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा एकत्र आल्याचं त्यांनी कधी पाहिलेले नाही. सत्ताधारी-विरोधक हे केवळ गैरसमज पसरवतायेत. मराठा समाजात गोंधळ निर्माण करुन गैरसमज पसरवण्याचे षडयंत्र आहे. समाजाला वेड्यात काढण्यासाठी हा चालुपणा आहे असा आरोपही मनोज जरांगे पाटलांनी केला.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »