khabarbat

IndiGo flight suffered technical snag

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

IndiGo flight I इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड; २०० प्रवासी १० तास अडकले

khabarbat News Network
An IndiGo flight was coming from Istanbul to New Delhi, during which the aircraft suffered a technical problem and the aircraft could not take off on time. A few hours later the plane took off.

नवी दिल्ली I गेल्या काही काळापासून विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या अनेक घटना घडत आहेत. आता ताजी घटना इंडिगो कंपनीच्या विमानासोबत घडली. इंडिगोची फ्लाइट इस्तंबूलहून नवी दिल्लीला येत होती, या दरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि विमान वेळेवर उड्डाण घेऊ शकले नाही. काही तासानंतर विमानाने उड्डाण घेतले.

नवी दिल्लीला येणारे इंडिगोचे विमान बुधवारी २०:०० वाजता उड्डाण करणार होते. मात्र विमानातील तांत्रिक बिघाडामुळे विमानाला उड्डाण करायला उशीर झाला. विशेष म्हणजे, विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे लहान मुले आणि वृद्धांसह २०० हून अधिक प्रवासी इस्तंबूल विमानतळावरच १० तासांपेक्षा जास्त काळ अडकून पडले.

इंडिगोने सांगितले की, विमानातील तांत्रिक बिघाडामुळे इस्तंबूलहून दिल्लीला येणा-या फ्लाइट ६ए १२ ला उशीर झाला. उशीर होणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. त्यांना अल्पोपाहारही देण्यात आला. तसेच, आवश्यक तपासण्यांनंतर त्याच विमानाने उड्डाण केल्याचे कंपनीने सांगितले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »