khabarbat

Currently bus-train and metro services are suspended in Bangladesh. To prevent violence from escalating, the government has shut down mobile internet. Schools, colleges and madrassas are closed indefinitely. The army has taken to the streets all over the country.

Advertisement

Bangladesh Protest I बांगलादेश पेटले; आरक्षणविरोधी आंदोलनात १५० बळी

  • संपूर्ण देशात सैन्य रस्त्यावर उतरले 
  • बस-ट्रेन आणि मेट्रो सेवा ठप्प
  • मोबाइल इंटरनेट बंद केले
  • शाळा, महाविद्यालयासह मदरसे अनिश्चितकाळासाठी बंद
  • १५० जणांचा मृत्यू झाला असून २५०० लोक जखमी

ढाका I बांग्लादेशात सध्याच्या घडीला बस-ट्रेन आणि मेट्रो सेवा ठप्प आहे. हिंसाचार वाढू नये, म्हणून सरकारने मोबाइल इंटरनेट बंद केले आहे. शाळा, महाविद्यालयासह मदरसे अनिश्चितकाळासाठी बंद आहेत. संपूर्ण देशात सैन्य रस्त्यावर उतरले आहे. बांग्लादेशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

आरक्षणविरोधात देशव्यापी आंदोलन अधिक प्रखर बनत चालले आहे. या आंदोलनामुळे बांग्लादेशच्या वेगवेगळ्या भागात आतापर्यंत १५० जणांचा मृत्यू झाला असून २५०० लोक जखमी झाले आहेत. विविध शहरात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी सुरु आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून अनेक शहरात लाठी, दांडे आणि दगड घेऊन आंदोलक रस्त्यावर फिरत आहेत.

मागच्या १५ दिवसांपासून हिंसक आंदोलनाने तिथल्या पोलीस, प्रशासन आणि संपूर्ण सत्तेला हादरवून सोडले आहे. बांग्लादेशातील तरुण पोलीस बळ आणि कायदा दोन्ही मानायला तयार नाहीत. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून आवाहन केलं जात आहे. पण त्याचा काही परिणाम होत नाही. बांग्लादेशची राजधानी ढाका विरोधाचे मुख्य केंद्र बनली आहे. हिंसक आंदोलनामुळे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली.

अशी आहे बांग्लादेशातील आरक्षण व्यवस्था…
– बांग्लादेशात स्वतंत्रता सेनानी म्हणजे मुक्ती योद्धाच्या मुलांना ३० टक्के आरक्षण.
– महिलांसाठी १० टक्के आरक्षण.
– वेगवेळ्या जिल्ह्यात १० टक्के आरक्षण निश्चित.
– जातीगत अल्पसंख्यकांसाठी ६ टक्के कोटा आहे. यात संथाल, पांखो, त्रिपुरी, चकमा आणि खासी या जाती आहेत.
– सर्व आरक्षण मिळून ते ५६ टक्के होते.
– अन्य ४४ टक्के मेरिटवर आहे.
– बांग्लादेशात हिंदुंसाठी आरक्षणाची कुठलीही वेगळी व्यवस्था नाही.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »