वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्याचा प्रयत्न फसला असून मारेक-याची ओळख पटली आहे. घटनास्थळी सुरक्षेत तैनात असलेल्या यूएस सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी त्याला जागीच ठार केले.
मात्र आता, तो कोण होता आणि कोठे रहायचा? या संदर्भातील माहिती समोर आली आहे. हल्लेखोराने साधारणपणे १२० मीटर अंतरावरून ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली होती. अमेरिकन तपास यंत्रणा या हल्ल्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न म्हणून पाहात आहेत.
थॉमस मॅथ्यू क्रुक्स असे हल्लेखोराचे नाव होते. तो २० वर्षांचा होता आणि पेनसिल्व्हेनियातील बेथेल पार्क येथील रहिवासी होता. बेथेल पार्क बटलरपासून साधारणपणे ४० मैल दक्षिणेला आहे.
The attempt to kill former US President Donald Trump by shooting has failed and the killer has been identified. He was killed on the spot by US Secret Service agents who were guarding the scene.
The assailant was identified as Thomas Matthew Crooks. He was 20 years old and a resident of Bethel Park, Pennsylvania. Bethel Park is approximately 40 miles south of Butler.
An AR 15 semi-automatic rifle has been recovered from the spot. Probably with the help of this rifle the young man opened fire on Donald Trump and his rally. Following this, the assailant was shot in the head and died on the spot in a retaliatory operation by the US Secret Service.
घटनास्थळावरून एआर १५ सेमी-ऑटोमॅटिक रायफल जप्त करण्यात आली आहे. बहुधा याच रायफलच्या सहाय्याने तरुणाने डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रॅलीवर गोळीबार केला. यानंतर, यूएस सीक्रेट सर्व्हिसने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत हल्लेखोराच्या डोक्याला गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
डोनाल्ड ट्रम्प ज्या व्यासपीठावरून भाषण देत होते, त्या व्यासपीठापासून १२० मीटर अंतरावर असलेल्या एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या छतावरून हल्लेखोराने गोळीबार केला.
बटलर फार्म शोग्राऊंडवर डोनाल्ड ट्रम्प यांचे ओपन-एअर कँपेन आयोजित करण्यात आली होती. येथे एवढी मोकळी जागा होती की, स्रायपरला लक्ष्य साधण्यात कोणतीही अडचण आली नाही.
हल्लेखोर आपल्या जागेवरून ट्रम्प यांना कुठल्याही अडथळ्याशिवाय स्पष्टपणे बघू शकत होता. न्यूयॉर्क पोलिसांनी शनिवारी (१३ जुलै) या घटनेनंतर, ट्रम्प टॉवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.