khabarbat

Zhiying Zeng based in Chile, is all set to make his Olympic debut. She is a table tennis player. The 58-year-old female athlete's journey is an inspiration to many.

Advertisement

Paris Olympic ! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रंगणार आजीबाईचा थरार …

पॅरिस : ऑलिम्पिकमध्ये खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. येत्या २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे. ११ ऑगस्ट २०२४ पर्यंत या बहुचर्चित स्पर्धेचा थरार रंगेल.उल्लेखनिय म्हणजे यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांना Zhiying Zeng आजीबाई दिसणार आहेत. ५८ वर्षीय या महिला खेळाडूचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायक आहे. चीली या देशातील असलेल्या झीइंग जेंग ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. त्या एक टेबल टेनिस प्लेयर आहेत.

वयाच्या ५८ व्या वर्षी झीइंग यांनी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला. त्यांनी (Paris Olympic 2024) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्रता मिळवली आहे. त्यांनी टेबल (table tennis) टेनिसमधून संन्यास घेतला होता. मात्र कोरोनाचा काळ त्यांच्यासाठी एक संधी घेऊन आला.

या कालावधीत त्यांनी घरी टेबल टेनिसचा सराव करत या खेळाप्रतीची आवड जिवंत ठेवली. लॉकडाऊन संपताच स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेत सहज विजय मिळवण्यात त्यांना यश आले. २०२३ पर्यंत त्या देशातील आघाडीच्या खेळाडू बनल्या. मग चिलीच्या राष्ट्रीय संघासाठी त्यांनी पात्रता मिळवली.

झीइंग जेंग यांचा जन्म १९६६ मध्ये चीनमध्ये झाला. लहानपणी त्यांना आईने या खेळाचे धडे दिले. ११ व्या वर्षापासून त्या मोठ्या स्पर्धांमध्ये झळकू लागल्या. १९८३ पर्यंत जेंग यांची चीनच्या राष्ट्रीय टेबल टेनिस संघासाठी निवड झाली आणि मग त्यांनी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहिले.

१९८६ मध्ये सुरू झालेल्या ‘टू-कलर रूल’मुळे त्यांच्या खेळाला फटका बसला आणि त्यांनी चीनचा राष्ट्रीय संघ सोडला. त्यानंतर (Zhiying Zeng) झीइंग जेंग यांनी चिलीमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि नंतर चिनी वस्तूंच्या आयात व्यवसायात स्वत:ला झोकून दिले.

मुलाचा व्हिडीओ गेमचा नाद सोडविण्यासाठी टेनिसकडे मोर्चा
२०२२ मध्ये जेंग यांनी पुन्हा एकदा टेबल टेनिस या खेळाकडे आपला मोर्चा वळवला. जेणेकरून त्यांच्या मुलाला लागलेली व्हिडीओ गेमची सवय सुटावी हा त्यामागील उद्देश होता. तिथूनच त्यांचा ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास सुरू झाला.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »