बंगळुरू : रामेश्वरम ते श्रीलंकेतील मन्नार बेटापर्यंत बांधलेल्या राम सेतूसंदर्भात (ISRO) इस्रोच्या शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले. शास्त्रज्ञांनी राम सेतूचा तपशीलवार नकाशा तयार केला आहे. यासाठी इस्रोने अमेरिकन स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट (NASA) च्या उपग्रहांचा डेटा वापरला आहे. सन १४८० पर्यंत अस्तित्व टिकवून राहिलेला रामसेतू (Ramsetu) चक्रीवादळामुळे हिंदी महासागरात बुडाला.
ISRO scientists achieved a major breakthrough with Ram Setu, which was built from Rameswaram to Mannar Island in Sri Lanka. Scientists have prepared a detailed map of Ram Setu.
वैज्ञानिकांनी ऑक्टोबर २०१८ ते ऑक्टोबर २०२३ पर्यंतचा आयसीई सॅट-२ च्या डेटाचा वापर करत जलमग्न सेतूच्या संपूर्ण लांबीचा १० मीटर रिझोल्यूशनचा मॅप तयार केला आहे. या मॅपमधून धनुष्कोडीपासून ते तलाईमन्नारपर्यंतच्या पुलाची माहिती मिळते. यात त्याचा ९९.९८ टक्के भाग पाण्यात बुडालेला आहे.
सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या उपग्रहासह सुसज्ज असलेल्या लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून बुडालेल्या या पुलाच्या संपूर्ण लांबीचा हाय रिझोल्यूशन नकाशा तयार केला आहे.
गिरिबाबू दंडबथुला यांच्या नेतृत्वाखाली संशोधन पथकाने ११ नॅरो चॅनल शोधून काढले आहेत. जे मन्नारचे आखात आणि पाल्कच्या सामुद्रधुनीदरम्यानच्या पाण्याच्या प्रवाहात महत्त्वाची भूमिका बजावतात.
चक्रीवादळामुळे ‘रामसेतू’ बुडाला…
संशोधकांनी म्हटले आहे की, या पुलाचे जहाजाच्या सहाय्याने सर्व्हे करणे शक्य नव्हते. रामेश्वरम (rameshavaram) मंदिरांच्या शिलालेखांवरून समजते की, हा पूल १४८० पर्यंत समुद्रातील पाण्यावर होता. मात्र, नंतर एक चक्रीवादळ आल्याने तो बुडाला.