khabarbat

In the last four years, Hingoli district has experienced 25 earthquakes. So now this lab may be in trouble.

Advertisement

LIGO India Project : हिंगोलीतील ‘नासा’चा ‘लिगो’ प्रकल्प भूकंपामुळे अडचणीत!

khabarbat News Network
संभाजीनगर : मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ०७:१४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.  या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ एवढी नोंदविण्यात आलेली आहे.
हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर तर विदर्भातील बुलढाणा, वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. तर (NASA) नासाचा मराठवाड्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प पण अडचणीत आला आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात आहे. गेल्यावर्षी पण येथेच केंद्रबिंदु होता. २१ मार्च २०२४ रोजी याच ठिकाणी ४.५ रिस्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला होता.
नासा (NASA) चा प्रकल्प अडचणीत
गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात नासा प्रयोगशाळा उभारत आहे. भारतातील ही पहिली प्रयोगशाळा लिगो इंडिया प्रकल्प (Ligo India Project) उभारण्यात येत आहे. ही जगातील तिसरी सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे.
In the last four years, Hingoli district has experienced 25 earthquakes. So now this lab may be in trouble.
औंढा तालुक्यातील दुधाळा, अंजनवाडा या भागात या प्रयोगशाळेचे काम सुरु आहे. या प्रयोगशाळेसाठी १७१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. तर सरकारने ४० हेक्टर जमीन दिली आहे. ही प्रयोगशाळा भौतिकशास्त्र या विषयावरील अभ्यास करण्यासाठी उभारण्यात येते.
भूकंपप्रवण क्षेत्रात अशी प्रयोगशाळा उभारता येत नाही. पण गेल्या चार वर्षांत हिंगोली जिल्ह्यात २५ वेळा भूकंप झाले आहेत. त्यामुळे आता ही प्रयोगशाळा अडचणीत सापडू शकते आणि हा प्रकल्प कदाचित बाहेरील राज्यात जाण्याची भीती एमजीएम (MGM) अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक तथा हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केली आहे.
Most Admired E-Paper khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »