khabarbat News Network
लातूर/धाराशिव : नीट घोटाळ्यातील आरोपी इरण्णा कोनगुलवार यास प्रशासनाने अखेर निलंबित केले. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआर येथे निदेशक पदावर कोनगुलवार कार्यरत असल्याचे सांगितले जाते. इरण्णा याच्यावर लातूरमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पेपरफूटी प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

It is the first time that the central government has admitted that the NEET paper was leaked and has told the Supreme Court that a case has been registered and the accused have been arrested. The central government has also told the Supreme Court that the students who have benefited in the paper futi have been identified.
कोनगुलवारच्या मागावर पोलीस असून तो अद्याप फरार असल्याचे सांगण्यात आले. नीट पेपरफुटी प्रकरणी देशभर गदारोळ माजला असून या गैरव्यवहाराचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्येही सापडले आहेत. नीटमध्ये गुण वाढवून देण्यासाठी दिल्लीतील आरोपी गंगाधर यांच्या संपर्कात असाणारा उमरगा आयटीआरमधील नोकरी करणा-या इरण्णा कोनगुलवार या आरोपीवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणात तो मध्यस्थाची भूमिका वठवत होता अशी माहिती देण्यात आली होती.
नीटचा पेपर लीक झाला असल्याची कबुली पहिल्यांदाच केंद्र सरकारने दिली असून याप्रकरणी गुन्हा नोंद करून आरोपींनाही अटक केल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. पेपरफुटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना फायदा झाला त्यांची ओळख पटली असल्याचेही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.