khabarbat

Chhatrapati Sambhajinagar's former BJP Deputy Mayor Raju Shinde has joined Shiv Sena's Uddhav Balasaheb Thackeray faction. In the presence of Shiv Sena chief Uddhav Thackeray, Raju Shinde tied Shiv Bandhan on his hands. Raju Shinde joined the Thackeray group at the Shiv Sankalp Mela organized at Chhatrapati Sambhajinagar. As many as 18 people, including Raju Shinde, joined the Thackeray group after leaving the BJP.

Advertisement

Shivsena : संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का, राजू शिंदे ठाकरे गटात

khabarbat News Network
संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातात शिवबंधन बांधलं. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदेंनी ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदेंसह तब्बल 18 जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केला.  
Chhatrapati Sambhajinagar’s former BJP Deputy Mayor Raju Shinde has joined Shiv Sena’s Uddhav Balasaheb Thackeray faction. In the presence of Shiv Sena chief Uddhav Thackeray, Raju Shinde tied Shiv Bandhan on his hands. Raju Shinde joined the Thackeray group at the Shiv Sankalp Mela organized at Chhatrapati Sambhajinagar. As many as 18 people, including Raju Shinde, joined the Thackeray group after leaving the BJP.
 भाजप मध्ये राहून आपले प्रश्न सुटत नाहीत अशी भावना कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे आम्ही भाजप सोडणार आहोत. मी महापौर, शहराध्यक्ष होऊ शकलो असतो पण झालो नाही याचा विचार भाजपने करावा, असे राजू शिंदे यांनी म्हटले होते. भाजपकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नही पाहायला मिळाले. मात्र राजू शिंदेंनी आता या गोष्टीला उशीर झालाय असे वरिष्ठांना सांगितले होते. त्यानंतर आज राजू शिंदे यांनी 6 नगरसेवकांसह ठाकरे गटात प्रवेश केला.
उद्धव ठाकरे यांचा आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. या शिवसंकल्प मेळाव्यादरम्यान भाजपच्या उपमहापौर राजू शिंदेंनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदेंसोबत भाजपचे नगरसेवक गोकुळ मलके, प्रल्हाद निमगावकर, अक्रम पटेल, प्रकाश गायकवाड, रुपचंद वाघमारे यांनीही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »