नवी दिल्ली : टीम इंडियाने आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट टीमचा पराभव केला. त्यानंतर आता हायव्होल्टेज सामना होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. मात्र या सामन्यात माजी खेळाडू असणार आहेत.
वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स २०२४ स्पर्धेला ३ जुलैपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी असणार आहेत. या स्पर्धेत ६ संघात माजी खेळाडू खेळणार आहेत.
The World Championship of Legends 2024 starts on July 3. Accordingly, a high voltage match between Team India Pakistan will be held on July 6.
प्रत्येक संघ या स्पर्धेत एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहे. त्यानुसार टीम इंडिया पाकिस्तान हा सामना ६ जुलै रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे बर्मिंगहॅम आणि नॉर्थम्टन येथे आयोजित करण्यात आले आहेत.
या स्पर्धेत टीम इंडियाच्या माजी दिग्गजांच्या संघाचे नाव हे इंडिया चॅम्पियन्स असे आहे. तर पाकिस्तानच्या टीमचे नाव पाकिस्तान चॅम्पियन्स असे आहे.
युनूस खान पाकिस्तान चॅम्पियन्स टीमचं नेतृत्व करणार आहे. युनूस खान याच्या नेतृत्वात पाकिस्तान क्रिकेट टीमने २००९ साली टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली होती. तर युवराज सिंह याच्याकडे इंडिया चॅम्पियन्सची सूत्र आहेत. टीम इंडियाने २००७ साली वर्ल्ड कप जिंकला होता. युवराज सिंह त्या टीमचा सदस्य होता.
पाकिस्तान चॅम्पियन्स : यूनुस खान (कॅप्टन), मिस्बाह उल हक, शाहिद अफ्रिदी, कामरान अकमल, अब्दुल रझ्झाक, वाहेब रियाझ, सईद अजमल, सोहेल तन्वीर, सोहेल खान, तन्वीर अहमद, मुहम्मद हफीझ , आमीर खान, शोएब मलिक, शोएब मकसूद, शार्जिल खान आणि उमर खान
इंडिया चॅम्पियन्स टीम : युवराज सिंह (कॅप्टन), हरभजन सिंह, सुरेश रैना, इरफान पठान, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, यूसुफ पठान, गुरकीरत मान, राहुल शर्मा, नमन ओझा, राहुल शुक्ला, आरपी सिंह, विनय कुमार, धवल कुलकर्णी, अनुरीत सिंह आणि पवन नेगी.