हाथरस (Hatharas, UP) : भोलेबाबाच्या भक्तांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला. सत्संगात भाविक तल्लीन झाले होते. तेव्हाच अचानक चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. कोणी पायाखाली चिरडल्या गेले. तर काही जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, १०७ जणांचा मृत्यू झाला.

A great mountain of grief fell on the devotees of Bhole Baba. The devotees were engrossed in the satsang. That’s when the stampede suddenly started. Some were crushed underfoot. Some people died of suffocation. According to the information available so far, 26 women have died.
अनेक भाविक गंभीर आहेत. या घटनेने आयोजकांसह भाविक भक्तांच्या नातेवाईकांना पण धक्का बसला आहे. सरकारी रुग्णालय आणि खासगी रुग्णालयाबाहेर नातेवाईकांच्या आक्रोशाने सर्वांचीच मने हेलावली आहेत.
सीएमओ एटा, उमेश कुमार त्रिपाठी यांनी सांगितले की , आतापर्यंत २७ मृतदेह पोस्टमार्टम हाऊसमध्ये आले आहेत, ज्यात २५ महिला आणि २ पुरुष आहेत. अनेक जखमींनाही दाखल करण्यात आले आहे. तपासानंतर अधिक तपशील समोर येईल.
उत्तर प्रदेशमधील (hatharas) हाथरस येथील रतिभानपूर येथे चेंगराचेंगरी झाली. जखमींना उपचारांसाठी एटा (Eta) येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
कोण आहे भोले बाबा…
भोले बाबा मूळचे कांशीराम नगर (कासगंज) येथील पटियाली गावचा रहिवासी आहे. यापूर्वी ते उत्तर प्रदेश पोलिसात होते, त्यांनी व्हीआरएस घेतली आणि त्यांच्याच गावात एका झोपडीत राहतात. उत्तर प्रदेश आणि जवळपासच्या राज्यांमध्ये फिरतात आणि लोकांना देवाच्या भक्तीचा धडा देतात.
भोले बाबा सांगतात त्यांच्या जीवनात गुरू नाही. व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांची अचानक देवाशी भेट झाली आणि तेव्हापासून त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला. भगवंताच्या प्रेरणेने हे शरीर त्याच भगवंताचे अंश आहे हे त्यांना कळले. यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन मानव कल्याणात घालवण्याचा निर्णय घेतला.