khabarbat

Maratha MLAs should unite on the issue of reservation and Sagesoyre. Manoj Jarange has asked a direct question that will you come together after we die.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

मनोज जरांगे अगतिक! आमदारांना म्हणाले, आम्ही मेल्यावर एकत्र येणार का?

khabarbar News Network

संभाजीनगर : आरक्षण आणि सगेसोयरेच्या मुद्यावर मराठा आमदारांनी एकत्र यायला हवे. आम्ही मेल्यावर तुम्ही एकत्र येणार का, असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी विचारला आहे.

Maratha MLAs should unite on the issue of reservation and Sagesoyre. Manoj Jarange has asked a direct question that will you come together after we die.

६ जुलै ते १३ जुलै शांतता रॅलीत सर्वांनी एकत्र यावे. आता हीच वेळ आहे. मराठा आमदारांनी आता एकत्र यावे आणि अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलावे. ते अधिवेशनात मराठा आरक्षणाची मागणी करतील, असे वाटत आहे. आम्ही मेल्यावर तुम्ही एकत्र येणार का, असा संतप्त सवाल मनोज जरांगे यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुम्ही माझी निष्ठा विकत घेऊ शकत नाही. मराठा समाज एक झाल्याने यांचे पोट दुखत आहे. किती जरी झाकले तरी ते उघडे होतच आहे. आपल्याला सुद्धा परिवार आहे, आपले सुद्धा आंदोलन आहे. मी कोणाला घाबरत नाही, माझा रस्ता स्पष्ट आहे. मराठा समाजाला टक्कर देण्याचे काम कोणी करू नये. आता तर मी आंतरवाली सराटीत कुठेही राहणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »