khabarbat

Shiv Sena Shinde group's Beed district chief Kundlik Khande has finally been hit by anti-party action

Advertisement

Beed Politics : कुंडलिक खांडे यांना पोलीस कोठडी, शिवसेनेतून हकालपट्टी

khabarbat News Network

बीड : पक्ष विरोधी कारवाई केल्याचा फटका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अखेर बसला आहे. हत्येचा प्रयत्न केल्याच्या जुन्या प्रकरणात त्यास अटक करण्यात आली असून ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तसेच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

कुंडलिक खांडे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्यातील संवादाची कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Shiv Sena Shinde group’s district chief Kundlik Khande has finally been hit by anti-party action. Shiv Sena Secretary Sanjay More has said in a press release that he has been arrested in an old case of attempted murder and sent to police custody for 3 days and also expelled from Shiv Sena.

जामखेड येथून कुंडलिक खांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा ताबा आता बीड ग्रामीण पोलिसांकडे देण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी कुंडलिक खांडे यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये कुंडलिक खांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला आहे. महाराष्ट्रात लोकसभेला कमी जागा मिळाल्यानंतर महायुतीत घटक पक्षांमध्ये कोणी काम केले कोणी मदत केली नाही याची झाडाझडती सुरु असून आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

या क्लिपमध्ये कुंडलिक खांडे यांनी, आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महायुतीत मोठे वादळ निर्माण झाले आहे. आपण ३७६ बुथवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना मदत केली, असे कुंडलिक खांडे म्हणाले होते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »