khabarbat News Network
नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे नोएडा आणि दिल्लीत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सोसाट्याच्या वा-यामुळे अनेक झाडे तसेच दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ चे छतही कोसळले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले.
Due to heavy rain, many places in Noida and Delhi experienced heavy rain. Several trees and the roof of Terminal-1 of Delhi’s Indira Gandhi International Airport collapsed due to gusty winds.
दिल्ली-एनसीआरमध्ये पहिल्या मोठ्या पावसामुळे उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला असतानाच, आज (शुक्रवारी) पहाटे सोसाट्याच्या वा-यासह झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले. विमानतळाचे छत कोसळल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच वाहनांमधून जाणारे अनेक जण गंभीर जखमी झाले असून एक जण अडकला आहे.
प्रत्यक्षात आज (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला आणि सोसाट्याच्या वा-यासह पावसाला सुरुवात झाली. नोएडा, दिल्ली आणि लगतच्या भागात तासाभराहून अधिक काळ जोरदार पाऊस झाला.