khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Beed : संतप्त मुंडे समर्थकांचा बीडमध्ये राडा; खाडेच्या ऑफिसवर हल्ला, दगडफेक

Khabarbat News Network

 

संभाजीनगर : कुंडलिक खाडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बीडमधील पंकजा मुंडे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. बीड शहरातील जालना रोडवर असलेल्या खाडे यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आणि तोडफोड करण्यात आली. तथापि, या कथित ऑडिओ क्लिपची khabarbat.com पुष्टी करत नाही.

कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आज (गुरूवारी) मुंडे समर्थकांनी कुंडलिक खाडे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. कथित ऑडिओ क्लिप मध्ये कुंडलिक खांडे हे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या बाबत बोलत आहेत. यानंतर मुंडे समर्थकांकडून जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. कुंडलिक खांडे यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकला नाही, ते मुंबईत असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्याकडून देण्यात आली.

कुंडलिक खाडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चर्चा सुरू असताना निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना त्यांनी कशी मदत करायची हे सांगतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओतून दोघांमधील संवाद ऐकायला मिळत आहे.

दुसरी ऑडिओ क्लिप ही मतमोजणीनंतरची आहे, ज्यामध्ये म्हाळस जवळा या कुंडलिक खांडेंच्या मूळ गावातून पंकजा मुंडेंना मुद्दाम लीड दिली. कारण, ओबीसी मताचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे सांगत असताना बीड विधानसभा मतदारसंघातील सगळ्या बुथवर कशाप्रकारे बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली ते सांगत आहेत. त्यामध्ये, धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड त्यांच्याबाबतीत बोलत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचंही बोलत आहेत.

कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली कुंडलिक खाडे देत आहेत.

तसेच या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची भाषा करत आहेत. निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली. आता त्यावरून बीडच्या राजकारणात जोरदार पडसाद उमटत आहेत.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »