khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

OBC Reservation : मराठा, ओबीसी आंदोलन सरकारच्या गळ्यात गुंतणार!

 

 

ओबीसींचे ‘आरक्षण बचाव’ सरकार पुरस्कृत : जरांगे

 

khabarbat News Network

 

संभाजीनगर : आम्हाला सरकारने १७-१७ दिवस उपोषणाला बसवले. कोणते लाड केले? माझा त्यांना (OBC) विरोध नाही. त्यांनी आंदोलन करावे. मी आंदोलन करणा-यांना दोषच देत नाही. त्यांना तो अधिकार आहे. हे सरकार घडवून आणत आहे; असा आरोप करत, मी सरकारला म्हणतोय, त्यांना (OBC) म्हणतच नाही. एक दिवस त्यांचेही आंदोलन संपणार आहे. आमचेही संपणार आहे. सरकार डाव खेळत आहे. पण सरकारच्या एक लक्षात येत नाही. हे त्यांच्याच गळ्यात गुंतणार आहे. तेच अडचणीत येणार, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटले. ते माध्यमांसोबत बोलत होते.

उपोषणामुळे प्रकृती खालवल्याने जरांगे छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. पुढे बोलताना जरांगे म्हणाले, पूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनात फार फरक आहे. राजकीय नेत्यांची चळवळ लगेच लक्षात येते. राजकीय नेते कसे टप्प्याटप्याने ठरवून निघाले. हे लगेच लक्षात येते. तू बस मी येतोच दुस-या दिवशी… तेथे बसलेल्या (उपोषणाला) बांधवांना (OBC बांधव) दोष देऊन काही उपयोग नाही. हे सर्व सरकार घडवून आणत आहे.

आत्महत्या करू नका…

मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येसंदर्भात बोलताना जरांगे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना, विद्यार्थ्यांना आणि तरुणांना माझी हात जोडून विनंती आहे की, आपल्याला कधी आरक्षण मिळणारच नव्हते. ते आता मिळू लागले आहे. यामुळे आरक्षण मिळत नाही म्हणून कुणी आत्महत्या करू नका.

मी आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही. मात्र, त्या आरक्षणात कुणाचा नंबर लागला नाही, तरी निराश होऊ आत्महत्या करू नका. आरक्षण नसल्याने कुणी नोकरीपासून वंचित राहिला तरी आत्महत्या करू नका. तुम्हाला काही दिवसांनी आरक्षण मिळेल. त्यानंतर पुन्हा काही प्रयत्न करा, कारण तुमचे भविष्य आत्महत्या केल्याने घडणार नाही.

आरक्षण मिळवून देणारच!

आज एखाद्या टक्क्याने हुकले असाल तर हुकू द्या. मी आरक्षण मिळवूनच देणार. मी आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही. मला एकही मराठी समाजाचा माणूस कमी होऊ द्यायचा नाही.

 

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »