Mecca Heat Wave : मक्केमध्ये मृत्यूचे तांडव, ५७७ यात्रेकरू दगावले
मक्का : वृत्तसंस्था सौदी अरेबियातील मक्का येथे १२ जून ते १९ जून या कालावधीत चाललेल्या हज यात्रेत ५७७ यात्रेकरूंचा मृत्यू झाला. यामध्ये ६८ भारतीयांचा समावेश आहे. याचे कारण सौदी अरेबियातील कडक उष्मा असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षी सुमारे १८ लाख यात्रेकरू हजसाठी दाखल झाले आहेत. यापैकी १६ लाख लोक इतर देशांतील आहेत….