नैरोबी : वृत्तसंस्था
भारतीय मूळ असलेल्या कावळ्यांमुळे केनिया हैराण झाला आहे. या देशात आगामी सहा महिन्यांत तब्बल १० लाख कावळे मारण्यात येणार आहेत. कावळ्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेती, हॉटेल, पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
केनियन सरकारने कावळ्यांविरुद्ध एका प्रकारचे युद्धच छेडले आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत देशातील साधारण १० लाख कावळे मारण्याचे उद्दीष्ट सरकारतर्फे निश्चित करण्यात आले आहे. भारतीय वंशाचे कावळे हे केनियन परिसंस्थेत तेवढे महत्त्वाचे नाहीत, असे केनियन सरकारचे म्हणणे आहे.
The Kenyan government has waged a war of sorts against the crows. The government has set a target of killing about 10 lakh crows in the country by the end of this year. The Kenyan government says that crows of Indian origin are not that important to the Kenyan ecosystem.
भारतीय वंशाचे हे कावळे १९४० च्या आसपास पूर्व आफ्रिकेत आल्याचे सांगितले जाते. या कावळ्यांमुळे तेथील स्थानिक प्रजातींवर नकारात्मक परिणाम होतो की काय, अशी भीती केनिया तसेच इतर आफ्रिकन देशांकडून व्यक्त केली जात आहे.
केनियन सरकारला पर्यटनातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. मात्र केनियात येणा-या पर्यटकांसाठी भारतीय कावळे त्रासदायक ठरत आहेत. पर्यटक हॉटेलमध्ये जेव्हा जेवत असतात, तेव्हा अन्नाच्या शोधात असलेल्या या कावळ्यांचा पर्यटकांना त्रास होतो, अशा तक्रारी केनियातील हॉटेल व्यवसायिक करतात.
केनियातील शेतक-यांनी सुद्धा भारतीय प्रजातीचे कावळे त्रासदायक ठरत असल्याचे मावानजानी रुनया या शेतक-याने म्हटले आहे. नुकतेच उगवलेले पीक आणि कोंबडीची पिले हे या कावळ्यांचे अन्न आहे. आम्ही लक्ष दिले नाही तर हे कावळे दिवसाला कोंबड्यांची २०-२० पिलं घेऊन जाऊ शकतात.