आजकाल अनेक तरूणी-महिला बॉयफ्रेंड (boyfriend) जीन्सला अधिक पसंती देत आहेत. जीन्स पुरुषांसाठी आहे, असे अनेकांना वाटते. पण ही जीन्स महिलांसाठी, तरूणींसाठी आहे. याच्या नावाच्या उलट ‘बॉयफ्रेंड जीन्स’ची क्रेझ महिलांमध्ये अधिक पाहायला मिळत आहे.
Boyfriend जीन्सचे फायदे
– रेग्युलर जीन्सपेक्षा बॉयफ्रेंड जीन्स ही पाय आणि मांड्यांच्या इथे लूज, आरामदायी असते.
– इकडे-तिकडे धावताना किंवा फिरताना ही लूज जीन्स उत्तम वाटते. जास्त घट्ट नसते.
– फिरायला जाताना जीन्स फोल्ड करणे सोपे जाते.
– फॉरएव्हर फॅशनेबल असते.
– कमी उंची असणा-या महिलांसाठी उत्तम पर्याय
अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल राहिलेल्या मर्लिन मन्रोने याची सुरुवात केली. तिने याचा उल्लेख ‘बॉयफ्रेंड जीन्स’ असा केला नसला, तरी १९६० च्या दशकात ही आरामदायी जीन्स (denim) डेनिम प्रेमींची पहिली पसंती होती.
मात्र, २००० च्या दशकात बॉयफ्रेंड जीन्स खरोखरच फोकसमध्ये आली. अभिनेता (Tom Cruse) टॉम क्रूझची पूर्वाश्रमीची पत्नी केटी होम्सने ही जीन्स घातल्यावर बरीच चर्चा सुरू झाली. स्लिम फिट बॉडी आणि बॅगी जीन्स घातलेल्या केटीचा फोटो ब-याच फोटोग्राफर्सनी काढला आणि ती (trend) ट्रेंड मध्ये आली. महिलांना सैल, आरामदायी डेनिममध्ये, जीन्समध्ये स्वारस्य आहे, हे डेनिमच्या लक्षात आले आणि त्यानंतर विशेषत: महिलांसाठी अशी बॉयफ्रेंड जीन्स बनवण्यास सुरुवात झाली.
बॉयफ्रेंड जीन्स हा डेनिमचाच एक प्रकार आहे. जी घातल्यावर महिलांना खूप आरामदायक फिल येतो, ती स्टायलिशही आहे. काही लोक असेही मानतात, की आधी स्त्रिया त्यांच्या पुरुष सहका-यांची जीन्स घालत असत, कारण ती खूप आरामदायक होती. हेच लक्षात घेऊन कंपन्यांनी विशेषत: महिलांसाठी अशी जीन्स डिझाइन केली, जी आरामदायी तर असेल पण गबाळी न दिसता, एकदम स्टायलिश दिसेल.