महाराष्ट्रात पोलिस शिपाई पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१ मार्च २०२४ आहे. http://www.mahapolice.gov.in आणि policerecruitment2024.mahait.org या दोन साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.
उमेदवाराचे कमीत कमी वय हे १८ आणि जास्तीत जास्त २८ असावे. ही भरती प्रक्रिया पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची शारीरिक योग्यता चाचणी आणि लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाणार आहे. लेखी परीक्षा ही १०० मार्कांची घेतली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१ मार्च २०२४आहे.
नोकरी विषयक Latest माहितीसाठी khabarbat.com
निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. याची नोंद घ्यावी.