केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत येणा-या ‘ईपीएफओ’मध्ये पर्सनल असिस्टंट पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

पर्सनल असिस्टंटच्या एकूण ३२३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया ७ मार्चपासून सुरु होत आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
२७ मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख.
ईपीएफओ (EPFO) पर्सनल असिस्टंट असे या परीक्षेचे नाव आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना पर्सनल (PA) असिस्टंट पदावर निवडले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराला स्टेनो आणि टायपिंगचा अनुभव आवश्यक आहे.9
३ टप्प्यांमध्ये परीक्षा
ही परीक्षा ३ टप्प्यांमध्ये होणार आहे. सर्वात आधी लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांची कागदपत्र तपासणी केली जाईल. तर अंतिम टप्प्यात वैद्यकीय चाचणी केली जाईल.
असा करा अर्ज….
ईपीएफओ पर्सनल असिस्टंट (EPFO PA) पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांनी upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरावा.