केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सहाय्यक नियंत्रक आणि इतर पद भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा अर्ज भरू शकतात.
या भरतीद्वारे एकूण ७३ पदे भरली जाणार आहेत, ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २ मार्च २०२३ आहे.
रिक्त पदे पुढील प्रमाणे …
एकूण पदे- ७३
फोरमॅन (एरोनॉटिकल) – १, फोरमन (केमिकल) – ४, फोरमन (IT) – २, फोरमन (इलेक्ट्रिकल) १, फोरमन (इलेक्ट्रॉनिक्स) – १, फोरमन (मेटलर्जी) – २, फो रमॅन (टेक्सटाईल) – २, उपसंचालक – १२, सहाय्यक नियंत्रक – ४७, कामगार अधिकारी – १ पद
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ मार्च २०२३
शैक्षणिक पात्रता
या सर्व पदांसाठी अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवाराने भरती अधिसूचनेमधील शैक्षणिक पात्रतेबद्दल तपशीलवार माहिती पहावी.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ३० वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत नियमानुसार सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्क
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५ रुपये भरावे लागतील, तर आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.