लंडन : हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहासमोरील अडचणीमध्ये सतत भर पडत आहे. एकीकडे अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होत असतानाच कंपन्यांचे बाजारमूल्यही लक्षणीय पद्धतीने घसरणीस लागले आहे.
अदानी समूहातील सर्वात मोठ्या विदेशी गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या फ्रान्सच्या (Total energies) टोटल एनर्जी या कंपनीने आपली भागीदारी आता स्थगित केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक पोयान (patrick pouyanne) याबाबत माहिती देताना म्हणाले कि, त्यांनी ५० अब्ज डॉलर गुंतवणुकीच्या हायड्रोजन प्रकल्पातील अदानी समूहासोबत भागीदारी तूर्त थांबवली आहे.
त्याचबरोबर देशातील विरोधकही अदानी समूहातील गैरव्यवहाराबद्दल सतत आरोप करत आहेत. दरम्यान, फ्रान्सच्या टोटल एनर्जीने अदानी समूहासोबतचा करार थांबवल्यामुळे अदानी समूहाला आता आणखी एक मोठा झटका बसला आहे. या प्रकणावरून ट्विटरवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
हिंडेनबर्ग रिसर्च या अमेरिकन फायनान्शिअल रिसर्च आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीने अदानी समूहावर फसवणुकीचा आरोप केल्यानंतर टोटल एनर्जीने हे पाऊल उचलले आहे.
फ्रेंच समूहाचे मुख्य कार्यकारी पॅट्रिक पौयान यांनी सांगितले की, गेल्या वर्षी जूनमध्ये अदानी समूहासोबत भागीदारीची घोषणा करण्यात आली होती परंतु कंपनीने अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नाही. पोयान म्हणाले, “अर्थातच, परिस्थिती आमच्यासाठी स्पष्ट होईपर्यंत हायड्रोजन प्रकल्प स्थगित ठेवण्यात आला आहे.”
टोटल एनर्जीजने अदानी समूहात सुमारे ४ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे, अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोप प्रकरणी चालू असलेल्या ऑडिट तपासणीच्या निकालांची total energy प्रतीक्षा करीत आहे.
जून 2022 मध्ये करण्यात आलेल्या घोषणेनुसार, Total Energies ने अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (ANIL) या अदानी ग्रुप कंपनीमध्ये २५ टक्के भागीदारी घेणार होती.
ही फर्म ग्रीन हायड्रोजन वातावरण प्रकल्पात १० वर्षांसाठी सुमारे ५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. त्याची प्रारंभिक क्षमता २०३० पूर्वी एक अब्ज टन असण्याचा अंदाज आहे.
TotalEnergies SE said its $3.1 billion investment in the gas and renewables units of Indian conglomerate Adani Group are healthy, but a hydrogen partnership is on hold for the moment.https://t.co/kdxEknQiIW
— Economic Times (@EconomicTimes) February 9, 2023