औरंगाबाद : नोकर भरती तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची द्विपक्षीय वाटाघाटीतून सोडवणूक करण्याच्या मुद्यावर भर देत महाराष्ट्र बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी पुन्हा ९ आणि १० फेब्रुवारी रोजी संपावर जात आहेत. यापूर्वी १६ आणि २७ जानेवारी रोजी महाबँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला होता.

आज का व्हाट्सएप स्टेटस। कृपया सभी रखे।
Today's WhatsApp status pic.twitter.com/SlMkRVzc4c— Devidas Tuljapurkar (@DTuljapurkar) February 5, 2023
डेप्युटी चिफ लेबर कमिशनर, मुंबई यांनी मध्यस्थी करूनही महाबँक व्यवस्थापन आपल्या आडमुठ्या धोरणावर ठाम राहिल्यामुळे कोणताही तोडगा निघू शकला नाही. उलटपक्षी बँकेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती न करण्याचा आणि हे काम आऊटसोर्स करण्याची भूमिका घेतली. गेल्या ५० वर्षांपासून संघटनेच्या कार्यालयासाठी जी जागा पुरवण्यात आली होती, ती देखील व्यवस्थापनाने ताब्यात घेतली. यामुळे बँकेतील औद्योगिक संबंध व्यवस्था अधिकच चिघळत आहे.
महाराष्ट्रात या बँकेच्या ११२६ शाखा आहेत, त्यामुळे संपाचा सर्वाधिक फटका महाबॅंकेला बसत आहे. दि. ९, १० फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात सर्व कर्मचारी, अधिकारी सामील होत असल्यामुळे राज्यातील महाबँकेच्या सर्व शाखांचे दरवाजे बंद राहणार आहेत, समस्त खातेदार, ग्राहकांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती निमंत्रक विराज टिकेकर आणि सह निमंत्रक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.