आफताब आणि श्रद्धा यांच्यातील इश्कबाजी ते हत्याकांड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘खबरबात.कॉम’ द्वारे वाचकांसाठी खुला परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात अनेक साधक-बाधक प्रतिक्रिया समोर आल्या. फेसबुकसह अन्य सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे १ हजार जणांनी सहभाग नोंदवला. पहिल्याच या अनोख्या उपक्रमास लाभलेला हा प्रतिसाद आम्हाला अतिशय आश्वासक वाटतो. या परिसंवादात सहभागी झालेल्या सर्व वाचक, लेखकांचे आभार. काही निवडक तसेच या विषयाशी साम्य असलेल्या facebook वरील काही प्रतिक्रिया येथे सम्पादित करून देत आहोत…..

………………………………………………
सारे विकल्प खत्म हो जाए, तब संबंध भी खत्म हो जाना चाहिए
हर सामान अपनी एक्सपायरी डेट के साथ आता है. एक्सापयरी डेट न हो तो आप उसे खरीदेंगे ही नहीं. आप यकीन नहीं करेंगे, पर पानी की बोतलों पर भी आजकल यूज बाय डेट (एक्सपायरी डेट) लिखी होती है. तो क्या रिश्तों की भी एक्सपायरी डेट होनी चाहिए? हमारा सांस्कृतिक ताना-बाना कुछ ऐसा ही है कि ऐसा कुछ कह देने पर ही आप खुद को कठघरे में खड़ा पाएंगे.
फिलहाल मामला आफताब और श्रद्धा का है. दोनों लिव-इन में थे. लड़का मुस्लिम, लड़की हिंदू. इस वजह से कई लोगों ने इसे लव जिहाद से जोड़ा तो कुछ लोग इसे और भी आगे ले जाकर देख रहे हैं. क्या हुआ, यह सबको पता है. क्यों हुआ, इसकी तलाश पुलिस कर रही है और कर ही लेगी. आखिर आफताब उसके कब्जे में जो है. फिर दिल्ली पुलिस यानी उसके डंडे के सामने तो गूंगे के मुंह में भी शब्द फूट पड़ते हैं.
इस मसले को थोड़ा और आगे जाकर देखना चाहिए. मेरी पहचान में अभी कम से कम पांच-छह युगल ऐसे हैं जो एक-दूसरे के साथ नहीं रहते. साथ रहेंगे भी नहीं. फिर भी उनका रिश्ता संबंध विच्छेद यानी तलाक तक नहीं पहुंचा है. कोई भी पहल नहीं करना चाहता. न जाने उन्हें क्या और कौन रोक रहा है. मेरे सामने ऐसे भी कई लोग हैं, जो किसी न किसी कारण से अलग हुए और अब जिंदगी में बहुत आगे बढ़ चुके हैं. खैर, बात निकली थी आफताब और श्रद्धा के रिश्ते को लेकर. अब तक जो सामने आया, उसके अनुसार श्रद्धा शादी करना चाहती थी और आफताब नहीं. इसी वजह से विवाद हुआ और बढ़ा. इसके बाद जो कुछ भी हुआ सब गूगल के टॉप ट्रेंड में है.
कुल मिलाकर सिर्फ इतना कहना है कि जब सारे विकल्प खत्म हो जाए, तब संबंध भी खत्म हो जाना चाहिए. यह एकतरफा नहीं हो सकता. अगर कोई साथ नहीं रहना चाहता तो उसे जाने की आजादी मिलनी चाहिए. पर इसमें सबसे बड़ी बाधा है ‘Let Go’ के लिए तैयारी न होना. ज्यादातर लोग अपने रिश्ते को खोना नहीं चाहते और व्यक्ति को ही खो देते हैं. मुझे लगता है कि इस मुद्दे पर मनोवैज्ञानिकों, मनोविश्लेषकों, दार्शनिकों, धर्मगुरुओं, सांस्कृतिक और अध्यात्मिक गुरुओं को भी खुलकर बात करना चाहिए.
– रवींद्र भजनी, भोपाळ
……………………………………………….
‘प्राणधारणा’ अलर्टनेस वाढवते…
पातंजल योगात ज्याला ‘प्राणधारणा’ असे नाव आहे आणि विपश्यना साधनेत जे ‘अनापानसति’ या नावाने ओळखले जाते ती ध्यानाची पूर्वतयारी आहे. यात आपण डोळे मिटून शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष द्यायचे असते. श्वास आतमध्ये घेतला जात आहे की बाहेर सोडला जात आहे, त्यावेळी श्वासाचा नाकपुडीला आतल्या बाजूने होणार स्पर्श जाणून घ्यायचा आहे. यावेळी आपल्या श्वासात कोणताही बदल करायचा नाही. जसा नैसर्गिक होतो आहे तसाच होऊ द्यायचा आहे. लहान मुलांसाठी दहा मिनिटे पुरेशी आहेत.
आपले मन आणि श्वासाची लय याचा थेट संबंध असतो. मनात काही विचार आले की त्यानुसार श्वासाची लय बदलते हा आपला नित्याचा अनुभव आहे. म्हणजेच श्वास हा आपले शरीर आणि मन यांना जोडणारा पूल आहे. आपण बाह्य गोष्टींच्या संपर्कात आल्यावर काहीवेळा अंतर्मनात दडपल्या गेलेल्या भावना किंवा वासना उफाळून बाह्यमनात येतात. अशावेळी सद्सदबुद्धी कामाला येत नाही. मन पूर्णपणे त्या वासनेच्या आहारी गेलेले असते. हीच वेळ असते जेव्हा या तरुण मुली फसतात. आपल्या वासना बहिर्मनात येऊन मनाचा ताबा घेण्यास काही क्षण लागतात. तेव्हाच आपण सावध झालो तर त्या वासना मनाचा ताबा घेऊ शकत नाहीत. वासना बहिर्मनात येताक्षणी आपल्या श्वासाची लय किंचित बदलते. आपण जर श्वासाच्या बाबतीत सजग असलो तर सावध होतो. आपल्याला आपल्या मुलां/मुलींमध्ये श्वासाबाबत हीच सजगता आणायची आहे. केवळ उपदेशाचे डोस पाजून हा प्रश्न सुटणार नाही. ज्या पालकांना याबाबत अधिक शिकायचे आहे त्यांनी गोएंका गुरुजींचे दहा दिवसांचे विपश्यना शिबीर करावे. http://www.dhamma.org येथे या शिबिराची अधिक माहिती मिळेल आणि नावही नोंदविता येईल. सुट्टीमध्ये तरुणांसाठी विपश्यनेचे आठ दिवसांचे वर्गही असतात.
– संतोष कारखानीस, ठाणे
…………………………………………………..
लढाऊ पंचकन्यांचे जागर होवोत…
मुलामुलींना आता अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी यांची उदाहरणं देऊ नका…
कारण या पाचहि स्त्रियांनी शोषण सहन केले… अन्याय सहन केलाय…
आता आपल्याला अशी पिढी… विशेषतः अशा मुली घडवायच्या आहेत की… ज्या अन्यायाविरुद्ध लढा देतील
सोशिक, अन्याय सहन करणाऱ्या अशा कुठल्याही स्त्रियांची उदाहरण मुलांना देऊ नका
अन्यायाविरुद्ध लढा देणारे आणि प्रसंगी शस्त्र हाती घेणाऱ्या महिलाच मुलींच्या डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजेत
नवीन श्लोक मुला मुलींना शिकवा…
चेन्नम्मा, लक्ष्मी, दुर्गा
वेलू, झलकारी तथा
पंचकन्या स्मरे नित्यम्
महाअसुरनाशनम्
– विक्रम इंगळे
……………………………………………………………..
शाश्वत गोष्टींना ‘एक्सपायरी’ नसते
अमर्याद व्यक्तीस्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पना, पाश्चात्य उपभोगवादी संस्कृतीचे आकर्षण, त्यात स्त्रीमुक्ती विचारांची अविचारी भर यातून स्वैराचार करण्याच्या मानसिकतेत असलेल्या तरुण मुली आणि त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले कट्टर धर्मांध शिकारी यातून ही ‘प्रकरणे’ – अर्थात भोगलोलूप संबंध निर्माण होतात. यात प्रेम, नाते यांचा काही संदर्भ नसतो. ‘प्रेम’,’ नाते’ या शब्दांचा संबंध पावित्र्य, मांगल्य, त्याग, अशा गोष्टींशी आहे.
साहजिकच या संकल्पना ईश्वरदत्त असल्याने त्यात व्यवहार नाही. ती मानव निर्मित उत्पादने नाहीत. त्यामुळे या शाश्वत गोष्टींना ‘एक्सपायरी’ असूच शकत नाही. किंबहूना तसा विचार करणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. तसे नसते तर आपण जगाच्या बाजारात वावरताना आज्या, पंज्यांची नावे टाळून वावरलो असतो?
– प्रा. श्रीकांत काशीकर, औरंगाबाद
………………………………………………………………..
नात्याला मर्यादा असावीच !
नाते संबंधाचा विषय निघाला म्हणून मत व्यक्त करते. Expiry पेक्षा मर्यादा असावी. आजकालचे नाते हे प्रेमापेक्षा त्या व्यक्तीच्या स्टेटस वर ठरवले जाते. मग भाऊ, बहीण असो की प्रेयसी… सर्वजण काही ना काही अपेक्षा ठेवत असतात. त्यात प्रेमापेक्षा पैसे किती आहेत यावर नात्याचे मापदंड ठरवले जातात. जसे माणूस रिटायर झाला की त्याने केलेल्या त्यागाची किंवा त्यांनी त्याच्या आयुष्याची सर्व वर्ष नाते संबंध जपण्यात निभवण्यात घालवली असतात ते सर्व विसरले जाते. हे कुठे तरी थांबवले पाहिजे. सर्वच नाते हे तकलादू नसते. नाते हे विश्वास, प्रेम, त्याग, यावर अवलंबून असते. फक्त एकच की नात्याचा पाया तकलादू असू नये तर त्याला मर्यादा तर नक्कीच असावी.
– नीता श्रीपाद सबनीस, औरंगाबाद
……………………………………………………………….
संस्कार आणि आत्मपरीक्षणाची गरज
आफताबने जे केले त्याची शिक्षा त्याला कायदा करेलच. पण तो या थरापर्यंत जाऊन निर्घृण हत्या करु शकतो याचं खापर काही अंशी त्याच्या कुटुंबाने दिलेल्या किंवा न दिलेल्या संस्कारावर फोडणे आवश्यक आहे. केवळ मुलं जन्माला घालण्यापलिकडे देखील पालकांचे काही कर्तव्य आहेत. आणि मुस्लिम धर्मीयांनी देखील आत्मपरीक्षण करत या विकृतीला आळा घालण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. असेच विकृती असलेले पुरुष तुमच्या धर्माचे प्रतिक बनतील आणि यातून धर्म आपोआप नष्ट होईल. इतर धर्माबद्दल द्वेषापेक्षा किंवा स्वधर्माबद्दल अनाठायी दुराग्रह पेक्षा, सदाचाराशिवाय पर्याय नाही हे मदरश्यात शिकवणे काळाची गरज आहे. धर्मावर खरं प्रेम करणारे हवे ते बदल करुन तो धर्म टिकवतात. ही मुस्लिम धर्मातील चांगुलपणा जपणाऱ्यांची जबाबदारी आहे.
राहीला प्रश्न श्रद्धाचा तर तीच्या विवेकाच्या अभावाने तीचा घात केला. ही सर्वस्वी जबाबदारी तीची व तिच्या कुटुंबाची आहे. स्वधर्माबद्दल स्वत:च्या संस्कृतीबद्दल तुम्हाला जर कुठलीच आपुलकी कर्तव्य भाव नसेल तर आफताब सारख्या असंवेदनशील विकृतीने भाळणाऱ्या मंद श्रद्धाच निपजतील.
जितकी आफताबच्या विकृतीची जबाबदारी मुस्लिम धर्मियांची आहे, तितकीच श्रद्धाच्या अविवेकाची व कमकुवतपणाची जबाबदारी हिंदु धर्मियांची आहे. अशा विकृतींपासुन आत्मरक्षण करण्यासाठी स्वधर्माबद्दल, संस्कृतीबद्दल ज्ञान देखील पुरेसे आहे, स्वाभिमान किंवा इतर धर्माबद्दल द्वेष गरजेचा नाही.
आपण आपल्या अपत्यांना आपल्या संस्कृतीचा वारसा कितपत देतो यावर त्यांचे भवितव्य आहे. तुमची आर्थिक सुबत्ता ही सुरक्षित समाजाशिवाय पांगळी आहे. आणि तुमच्या सुरक्षेचा सर्वात मोठा भाग तुमचा विवेक आहे. विवेक निपजण्यासाठीचे मार्ग जेवढे आपल्या संस्कृतीत आहेत तेवढे इतर कोठेही नाहीत. हा विवेक पुस्तकी शिक्षणातून किंवा डिग्रीतून मिळणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही.
– दिलीप एकबोटे