squash स्पर्धा : पाकशी चुरशीच्या लढतीत भारताला सुवर्ण
चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताची घोडदौड सुरूच आहे. आज भारताच्या स्क्वाश टीमने पाकिस्तानला धूळ चारत गोल्ड मेडल मिळवले. पुरुष स्क्वाश स्पर्धेतील अंतिम फेरीमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. भारताने २-१ फरकाने पाकिस्तानवर मात करत सुवर्णपदकावर पटकावले. पहिल्या सामन्यात भारताचा महेश विरुद्ध पाकिस्तानचा नासिर अशी लढत पहायला मिळाली. यामध्ये पाकिस्तानने विजय मिळवत १-० अशी आघाडी…