‘कविकट्टा’ मध्ये सुमिता सबनीस !

‘कविकट्टा’ मध्ये सुमिता सबनीस !

वर्धा : येथे सुरु असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादरीकरणासाठी कुंभी (ता. सेलू, जि. परभणी) येथील प्राथमिक शिक्षिका सुमिता सबनीस-पाठक यांना साहित्य परिषदेने निमंत्रित केले होते. साहित्य परिषदेच्या कविकट्टा कार्यक्रमात त्यांनी ‘काहूर’ ही कविता सादर केली. साहित्य परिषदेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.