स्वराज्य ढोल-ताशा पथकाचा स्वीडनमध्ये धमाकेदार गजर
एकीकडे पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना सात समुद्रापार महाराष्ट्रीय संस्कृती जपण्याचा यशस्वी प्रयत्न मराठीजणांनी केला. मुंबई, पुणे, नाशिकमधील ढोल-ताशा पथकाप्रमाणे धमाकेदार परफॉर्मन्स स्वीडनमधील गोथेनबर्ग मध्ये पाहायला मिळाला. स्वीडनमधील नागरिकांनी या ढोल – ताशा पथकाच्या ठेक्यावर ताल धरत चांगलीच दाद दिली. स्वीडनमध्ये पहिल्यांदा मराठीजणांनी ‘स्वराज्य ढोल-ताशा पथक’ स्थापन केले….