अमित शहा, एवढं खोटं बोलून तुम्हाला झोप कशी येते? सुषमा अंधारेंनी केला सवाल
पुणे : प्रतिनिधी अमित शाह, तुम्ही एवढं खोट कसं बोलता. एवढं खोट बोलून तुम्हाला झोप कशी येते? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. ७० हजार कोटींचा घोटाळा ज्यांनी केला त्यांना आम्ही चक्की पिसायला पाठवतो असे तुम्हीच जाहीर सभेत सांगितले होते. आज त्याच लोकांना तुम्ही जवळ घेऊन बसलात असेही अंधारे म्हणाल्या….