वाळूजचा हल्लेखोर कुत्रा फरार; प्रशासनाच्या कारवाईला ठेंगा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) च्या सिडको वाळूज महानगर-१ परिसरात मागील सहा दिवसांत पिसाळलेल्या कुत्र्याने ७ जणांवर हल्ला केला. हा कुत्रा समोर दिसेल त्याचा चावा घेत हाेता. या कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमींवर घाटीत उपचार सुरु आहेत. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर कुत्र्याला पकडण्यासाठी आलेल्या पथकाने परिसरातील दुसरेच कुत्रे पकडून कागदोपत्री कारवाई केली. मात्र, अजूनही खरा हल्लेखोर पिसाळलेला काळ्या-पांढऱ्या रंगाचा कुत्रा…