Ahmadnagar : निलेश लंके नडणार, की सुजय विखे बाजी मारणार!
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी गुरूवारी शरद पवार गटाची वाट धरत ‘तुतारी’ फुंकली. पुण्यातील पक्षकार्यालयात त्यांनी शरद पवार यांची भेट घेत अनौपचारिक प्रवेश केला. ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. बुधवारी भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण २० जणांचा समावेश आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने…