
Tanishka Garg | बठिंडाच्या तनिष्का गर्गचा बुद्धिबळाच्या पटावर चेकमेट; मिळवले फिडे मानांकन
बठिंडा : News Network अवघ्या आठ वर्षे, चार महिन्यांच्या तनिष्का गर्गने वय हे केवळ एक आकडा आहे, ही म्हण अक्षरशः खरी करून दाखवली आहे. आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या आणि अचूक चालींच्या जोरावर तिने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) मानांकन मिळवले असून, ही कामगिरी करणारी ती पंजाबमधील महिला गटातील सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. गेल्या महिन्यात गुरुग्राम येथे