
Tur Pulses | ३,४०,००० टन तूर खरेदी; तूरडाळीच्या दरात होणार घसरण
नवी दिल्ली : प्रतिनिधी देशातील तूर डाळीच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने किंमत समर्थन योजना (PSS) अंतर्गत या वर्षी आतापर्यंत ३,४०,००० टन तूर खरेदी केली आहे. त्यामुळे आगामी काळात तुरीच्या डाळीची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत