
आर्सेनिकची पातळी वाढल्यास भाताद्वारे कर्करोग बळावणार!
नवी दिल्ली : प्रतिनिधी हवामान बदलामुळे २०५० पर्यंत भातामध्ये आर्सेनिकची पातळी वाढू शकते. त्यामुळे आशियाई देशांतील लोकांमध्ये कर्करोग आणि आरोग्यविषयक धोके वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, २ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानवाढ आणि कार्बन डायऑक्साईडचे वाढते