
Corona spread up | ११ राज्यांत कोरोनाचा फैलाव; महाराष्ट्राला सर्वाधिक धोका
नवी दिल्ली : प्रतिनिधी कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने आतापर्यंत २५७ लोक बाधित झाले आहेत. देशाची राजधानी दिल्लीसह ११ राज्ये प्रभावित झाली आहेत. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. कोरोनाची ही नवीन स्ट्रेन कोविड १९ च्या पहिल्या आणि दुस-या म्युटेशन्सइतकी संसर्गजन्य नसू शकते. परंतु इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांवर याचा नकारात्मक परिणाम