
वाळू माफियांना मदत करणारे गेवराईचे २ पोलीस निलंबित
बीड : प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड पोलीस चांगलेच चर्चेत आले. नवे पोलीस अधिक्षक नवनीत कावंत यांनी सुत्रे हाती घेताच नवीन बदल केले आहेत. आता अवैध वाळू उपसा करणारे आणि वाळू माफियांना मदत करणा-या पोलिसांवर त्यांनी कारवाई केली. अवैध वाळू उपसा केल्या प्रकरणी आरोपींसोबत साटे लोटे करणा-या बीडच्या गेवराई