
संभाजीनगरात डिफेन्स पार्क; राजनाथ सिंग बैठक घेणार!
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी शहराच्या औद्योगिक परिसरात डिफेन्स पार्क व्हावे, यासाठी ठोस प्रस्ताव घेऊन दिल्लीत या, याबाबत अधिका-यांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेऊ, अशी सकारात्मक भूमिका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी येथे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर (सीएमआयए)तर्फे आयोजित उद्योजकांच्या बैठकीत मांडली. या संदर्भात दिल्लीत येऊन चर्चा करण्याचे निमंत्रणही संरक्षणमंत्र्यांनी ‘सीएमआयए’च्या पदाधिका-यांना दिले. हे