
Wheat & Rice | गहू, तांदूळही महाग होणार; पाण्याची टंचाईही भासणार
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी हवामान बदलामुळे भारतातील गहू आणि तांदळाचे उत्पादन ६ ते १० टक्क्यांनी घटेल. त्यामुळे त्याची महागाई वाढेल. यामुळे कोट्यवधी लोकांच्या परवडणा-या अन्नधान्याच्या उपलब्धतेवर, अन्न सुरक्षेवर परिणाम होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येत्या काळात पाणीटंचाईचा सामनाही करावा लागेल. किना-यावरील समुद्राचे पाणी अधिक उष्ण होत असून, त्यामुळे मासे खोल समुद्रात