आषाढी एकादशी आणि जाणून घ्या कसा करावा भागवत संप्रदायानुसार उपवास!
भागवत धर्मात किंबहुना संप्रदायात एकादशीच्या उपवासास फार मोठे पारमार्थिक मोल आहे. म्हणून वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळतात. आरोग्यदृष्ट्याही एकादशीचा उपास हा अतिशय लाभदायक असल्याचे शास्त्रकारांचे मत आहे. परंतु उपासाचे वेगवेगळे पदार्थ खाऊन (कथित) व्रत पालन करणे प्रकृतीच्या अनारोग्याचे कारण ठरू शकते. एकादशीच्या दिवशी तहानभूक हरपून जावी एवढे ईशचिंतन करावे, असे भागवत…